लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी जाहीर, पहा तुमचे पात्र यादीमध्ये नाव आहे का


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana List : राज्य सरकार अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना महिना दीड हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्यामुळे महिलांमध्ये मोठ्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

परंतु या योजनेबाबत मोठे मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि काही बदल देखील करण्यात आलेले आहेत. अशातच पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेमध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला आहे. व कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार देखील आपण या लेखांमधून सविस्तर जाऊन घेणार आहोत.

राज्यातील महिलांच्या खात्यावरती या योजनेचा पहिला हप्ता म्हणजे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यावरती 14 ऑगस्टपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 80 लाख महिलांच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत. व यानंतर 16 लाख पात्र महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा करण्यात आले असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

आदिती तटकरे यांनी दिलेला माहितीनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ हस्तंतराचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आज सकाळपासून सोळा लाख 35000 महिलांच्या खात्यावरती 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. व याआधी 80 लाख महिलांच्या खात्यावरती या योजनेचा लाभ हस्तांतरित केलेला आहे.

आतापर्यंत 96 लाख 35 हजार महिलांच्या खात्यावरती या योजनेचा लाभ यशस्वीरित्या जमा करण्यात आलेला आहे. लवकरच आणखी महिलांच्या खात्यावरती हा लाभ जमा होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

तसेच या योजनेची अर्ज करण्याची तारीख देखील वाढवण्यात आलेली आहे. आता महिलांना 30 सप्टेंबर पर्यंत या योजनेत अर्ज करता येणार आहेत. अशीच माहिती आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे. महिलांना 31 ऑगस्ट नंतर ही अर्ज करता येणार आहेत त्यामुळे आता महिलांमध्ये आणखी आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

2 thoughts on “लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी जाहीर, पहा तुमचे पात्र यादीमध्ये नाव आहे का”

Leave a Comment

error: Content is protected !!