आज लाडकी बहीण योजनेचे ₹4500 रुपये खात्यात होणार जमा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले पहा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Eknath Shinde on Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे. आज महिलांच्या खात्यावरती तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमांमध्ये दिली तर चला जाणून घेऊया महिलांच्या खात्यावरती कधीपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. व मुख्यमंत्री शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत काही महत्त्वाची अपडेट देखील दिलेली आहे. Eknath Shinde on Ladki Bahin Yojana

राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा केल्या जात आहेत. पण विधानसभा निवडणुकीत जर आम्हाला मोठा जनादेश दिला तर आम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे दुप्पट करून तीन हजार रुपये करू असा शब्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव इथे होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये लाडक्या बहिणींना दिलेला आहे.

महिलांना या योजनेअंतर्गत प्रति महिना 1500 रुपये दिले जातात. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या विधान केले आहे. आगामी निवडणुकीत जर त्यांची सत्ता आली तर लाडकी बहीण योजनेचे मासिक आर्थिक दुप्पट करून तीन हजार रुपये करू असे विधान शिंदे यांनी केलेले आहे.

या महिलांच्या खात्यावरती जमा होणार ₹4500 रुपये

लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रति महिना 1500 रुपयांचे आर्थिक मदत दिली जाते तसेच आतापर्यंत या योजनेचे दोन हप्ते महिलांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेले आहेत जुलै ऑगस्ट महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यावरती एक सोबत जमा करण्यात आलेले आहेत तसेच ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यानंतर अर्ज केले आहे त्या महिलांनाही जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे तिन्ही महिन्यांची मिळून चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत. तसेच ज्या महिलांना याआधी या योजनेचा दोन्ही आपट्यांचा लाभ मिळाला आहे अशा महिलांच्या खात्यावरती 1500 रुपये जमा होणार आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!