राज्य सरकारचा मोठा निर्णय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये झाले बदल, शासन निर्णय जारी


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana : राज्यात राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. याबाबत शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहे. राज्य सरकारने कोणकोणते नवीन बदल केले आहेत आपण या लेखांमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत.

राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यासाठी राज्यांमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. जुलै 2024 पासून या योजनेची अंमलबजावणी राज्यामध्ये केली आहे. Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana

राज्य सरकारने काही दिवसापूर्वी या योजनेसाठी अर्ज मागवले होते. आणि राज्य सरकारने ही योजना राबवल्या पासून याच्यामध्ये अनेक बदल केलेले आहेत. त्यात संदर्भात आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविका कडून घेतले जातील असा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे. महिला व बालविकास विभागाकडून यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे.

राज्य सरकारच्या नवीन निर्णय

राज्य सरकारने माजी मुख्यमंत्री योजनेबाबत एक मोठा निर्णय घेतलेला आहे महिला व बालविकास विभागाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत शासन निर्णय जाहीर केलेला आहे या शासन निर्णयानुसार लाडकी बहीण योजनेचे दाखल होणारे अर्ज ना मंजुरी देण्यासाठी केवळ अंगणवाडी सेविकांवर जबाबदारी असणार आहे. यापूर्वी या योजनेच्या अर्ज मंजूर करण्याचे काम 11 प्राधिकृत व्यक्तींना देण्यात आलेले होते मात्र आता केवळ अंगणवाडी का सेविका या अर्ज मंजूर देऊ शकतात.

यापूर्वी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका आणि अंगणवाडी सेविका समूह संघटक मदत कक्ष प्रमुख आशा सेविका सेतू केंद्र अंगणवाडी प्रवेशिका ग्रामसेवक आपले महासर्कार सेवा केंद्र यांना होते मात्र नव्या शासन निर्णयानुसार आता केवळ अंगणवाडी सेविका या मंजूर करू शकणार आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!